कोविड-19 साथीच्या आजारामुळे दीड वर्षांपासून बंद असलेल्या राज्यभरातील अंगणवाड्या 8 नोव्हेंबरपासून पूर्णत: सुरू होतील, अशी माहिती महिला व बालविकास मंत्री हलप्पा अचार यांनी दिली आहे.
कोविड-19 तांत्रिक सल्लागार समितीचा अभिप्राय घेऊन सरकारने अंगणवाड्या पुन्हा सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. तिसरी लाट येण्याची शक्यता मावळल्याने, तज्ञांनी अंगणवाडी केंद्रे पुन्हा सुरू करण्यास परवानगी दिली आहे.
ही केंद्रे दररोज दोन तास खुली राहतील. ज्या दरम्यान बालकांसह लाभार्थ्यांना पोषण आहार आणि इतर सुविधा पुरविल्या जातील,” असे मंत्र्यांनी पत्रकारांना सांगितले.