गेल्या 24 तासात बेळगाव जिल्ह्यात नव्याने फक्त 2 जणांना कोरोनाची लागण झाल्याचे आढळून आल्यामुळे आज रविवारी जिल्ह्यातील कोरोना बाधितांची एकूण संख्या 79 हजार 942 इतकी झाली आहे. तसेच जिल्ह्यात सध्या 67 ॲक्टिव्ह अर्थात सक्रिय रुग्ण आहेत.
बेळगाव जिल्ह्यात गेल्या 24 तासात नव्याने 2 कोरोनाग्रस्त रुग्ण आढळून आल्यामुळे आज रविवारी जिल्ह्यातील कोरोनाबाधीत रुग्णांची एकूण संख्या 79,942 इतकी झाली आहे. बेळगांव जिल्हा आरोग्य आणि कुटुंब कल्याण खात्याच्या सर्व्हिलन्स युनिटने प्रसिद्धीस दिलेल्या कोरोना वैद्यकीय पत्रकानुसार आज रविवार दि. 14 नोव्हेंबर 2021 रोजी सायंकाळी 7 वाजेपर्यंत कोरोनासंदर्भात बेळगांव जिल्ह्यात एकूण 15,18,992 व्यक्तींचे कोरोना वैद्यकीय निरीक्षण करण्यात आले.
जिल्ह्यात 14 दिवसांसाठी होम काॅरन्टाईन केलेल्या जिल्ह्यातील व्यक्तींची संख्या 51,590 झाली असून हॉस्पिटलमध्ये आयसोलेशन करण्यात आलेल्या व्यक्तींची संख्या 67 आहे.
काॅरन्टाईन अर्थात विलगीकरणाचा 14 दिवसांचा कालावधी पूर्ण केलेल्या लोकांची संख्या 49,958 आहे, तर काॅरन्टाईनचा 28 दिवसांचा कालावधी पूर्ण केलेल्या व्यक्तींची संख्या 14,17,377 आहे. कोरोना विषाणू संसर्ग निदानासाठी एकूण 15,17,900 जणांचे स्वॅब नमुने घेण्यात आले होते. त्यापैकी 79,942 नमुन्यांचा वैद्यकीय अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आला असून यामध्ये आज रविवारी नव्याने आढळलेल्या 2 जणांच्या अहवालांचा समावेश आहे.
प्रयोगशाळेत धाडलेल्या नमुन्यांपैकी 14,29,482 नमुने निगेटिव्ह असून जिल्ह्यात सक्रिय रुग्ण (ॲक्टिव्ह केसीस) 67 आहेत. त्याचप्रमाणे 3,564 नमुन्यांचा अहवाल प्रलंबित आहे.
जिल्ह्यात मृतांची संख्या एकुण 941 झाली आहे. कोरोना विषाणूच्या संसर्गापासून 78,934 रुग्ण मुक्त अर्थात पूर्णपणे बरे झाले असून त्यांना हॉस्पिटलमधून डिस्चार्ज देण्यात आला आहे. जिल्ह्यात आज रविवारी आढळलेल्या 2 कोरोनाग्रस्त रुग्णांमध्ये बेळगाव आणि रामदुर्ग तालुक्यातील प्रत्येकी एका रुग्णाचा समावेश आहे.