Saturday, November 16, 2024

/

झुंजार जेवर गॅलरी डायमंड्स कडे ‘विजेता’ चषक

 belgaum

जेवर गॅलरी डायमंड्स संघाने आपल्या लढवय्या वृत्तीचे प्रदर्शन करत कमी धावसंख्येचा झालेल्या अटीतटीच्या अंतिम लढतीत बीएसपी टायगर्सचा 14 धावांनी पराभव करत युनियन जिमखाना आयोजित विजेता चषक क्रिकेट स्पर्धेचे निर्विवाद अजिंक्यपद पटकावले.

स्पर्धावीर साईराज साळुंखे (एक्स्ट्रीम जूनियर्स), उत्कृष्ट फलंदाज श्रेया चव्हाण (हनी डॉट), उत्कृष्ट गोलंदाज बाळाराम कोलकार (बीएसपी टायगर्स), स्पर्धेवर छाप पडणारा खेळाडू जयशांत सुब्रमण्यम (बीएसपी टायगर्स), उत्कृष्ट यष्टीरक्षक सुमित भोसले (बीएसपी टायगर्स), प्रोमिसिंग खेळाडू मोहम्मद हमजा (जेवर गॅलरी डायमंडस), उगवता खेळाडू आरुष पुतरण (बीएसपी टायगर्स) ठरले

अंतिम सामन्यात प्रथम फलंदाजी करताना जेवर गॅलरी संघाने 25 षटकात 8 बाद 110 धावा केल्या सुरेंद्र पाटील 3 चौकारांसह 23, ओमकार चौगुले 3 चौकारांसह 19, अभिनव शर्मा 2 चौकारांसह 17 धावा केल्या. बीएसपी तर्फे नवीन बेकवाडकर, बाळाराम कोलकार, सोहम चव्हाण यांनी प्रत्येकी दोन तर जयशांत सुब्रमण्यम व विराज माळवी यांनी प्रत्येकी एक गडी बाद केला.

उत्तरादाखल जेवर गॅलरीच्या अचूक माऱ्यासमोर बीएसपी टायगर्स संघ 25 षटकात 9 बाद फक्त 96 धावा जमवू शकला जयशांत सुब्रमण्यम 2 चौकारांसह 30, सुमित भोसले 15 तर विराज माळवी 11 धावा केल्या. जेवर गॅलरी तर्फे षण्मुख एस व ओमकार चौगुले यांनी प्रत्येकी 2 तर सुरेंद्र पाटील व मोहम्मद हमजा यांनी प्रत्येकी एक गडी बाद केला अंतिम सामन्यातील सामनावीर ओमकार चौगुले इम्पॅक्ट प्लेयर जयशांत सुब्रमण्यम, उत्कृष्ट झेल हर्ष नाशिपुडी, मॅक्झिमम बाउंड्री सुरेंद्र पाटील हे ठरले तर प्रत्येक संघातील इम्पॅक्ट खेळाडू म्हणून जोया काझी( निना स्पोर्ट्स), श्रेया पोटे (हनी डॉट), आरव नलवडे (एक्स्ट्रीम जूनियर्स), स्वरूप साळुंके (कुबेर लायन्स), नवीन बेकवाडकर (बीएसपी टायगर्स) व ओमकार चौगुले (जेवर गॅलरी डायमंड) यांची निवड करण्यात आली.

बक्षीस वितरण समारंभात प्रमुख पाहुणे स्पर्धा पुरस्कर्ते चंद्रकांत कडोलकर निलेश देसाई व नागरत्न हिरेमठ यांच्या हस्ते विजेत्या व उपविजेत्या संघांना तसेच वैयक्तिक बक्षिसे पटकावणाऱ्या क्रिकेटपटूंना क्रिकेटचे साहित्य व चषक देऊन गौरविण्यात आले यावेळी संघ मालक समीर सलामवाले, सलमान गोकाककर, किरण बेनकट्टी, अजय सुनगार, प्रशांत पुतरण, जहुर अहमद सराफ, स्पर्धा संयोजक परशराम पाटील, सचिन साळुंखे, भाग्यश्री देसाई आदी मान्यवर उपस्थित होते अंतिम सामन्यात पंच म्हणून राजू बडवानाचे, विशाल तुकार व स्कोरर म्हणून गणेश ने काम पहिले मिलिंद चव्हाण यांनी सूत्रसंचालन केले

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.