क्रिकेट या खेळाला भारतात इतकी लोकप्रियता आहे की हा खेळ गावागावात घरा घरात पसरला आहे.आयपीएलच्या खेडोपाडीदेखील स्पर्धा भरत आहेत.बेळगाव तालुक्यातील सांबरा या गावात विराट स्पोर्ट्सच्या वतीनं सांबरा प्रीमियर लीग या स्पर्धेचे आयोजन करण्यात आलंय.
या स्पर्धेच्या आयोजनातील नफ्यातून गावासाठी सामाजिक उपक्रम राबवण्याचा स्तुत्य उपक्रम आयोजक विराट स्पोर्ट्सने केला आहे.स्पर्धेतून शिल्लक 50 टक्के रक्कम गावाला व्यसनमुक्त बनवून खेळाकडे युवकांचे लक्ष केंद्रित करण्यासाठी वापरला जाणार आहे इतकेच काय तर नफ्यातील 30 टक्के रक्कम गावांतील प्राथमिक मराठी आणि कानडी शाळांच्या विकासासाठी वापरली जाणार आहे.
सामाजिक बांधिलकी जपणाऱ्या सांबरा गावातील विराट स्पोर्ट्सच्या या उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत असून स्पर्धा शर्यतीचे आयोजन करा नफ्याची रक्कम गाव सुधारण्यासाठी वापरा हा संदेश त्यांनी इतर गावांना दिला आहे.
याच सांबरा प्रीमियर लिग (SPL) क्रिकेट स्पर्धेच्या आकर्षक चषकांचे अनावरण आणि खेळाडूंची लिलाव प्रक्रिया शिवाजी चौक येथे पार पडली.
विराट स्पोर्ट्सच्यावतीने आयोजित सांबरा प्रीमियर लिग (SPL) स्पर्धेला दि. 4 नोव्हेंबरपासून प्रारंभ होणार आहे. या स्पर्धेत वितरित करण्यात येणाऱ्या आकर्षक चषकांचे आणि मालिकावीरसाठी ठेवण्यात आलेल्या सायकलचे अनावरण देणगीदार आणि मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. स्पर्धेत प्रवेश देण्यात आलेल्या 8 संघांचे मालक, खेळाडू आणि प्रेक्षक उपस्थित होते.