10 वी, 12 वी पास उत्तीर्णांसाठी भारतीय नौदलात नोकरीची सुवर्णसंधी; 2500 पदांची भरती
10 वी आणि 12 वी पास उमेदवारांसाठी नोकरीची सुवर्णसंधी आहे. भारतीय नौदलामध्ये 2500 हून अधिक पदांची भरती केली जाणार आहे. यामध्ये आर्टिफिशर अप्रेंटिस AA ची 500 पदे आणि सिनिअर सेकेंडरी रिक्रूट SSR ची तब्बल 2 हजार पदे भरली जाणार असून यासंदर्भातील अधिक माहिती वेबसाईटवर देण्यात आली आहे.
SSR पदासाठी केवळ अविवाहित पुरुष उमेदवार अर्ज करू शकतात.
माहितीनुसार, दहावी (10+2) मध्ये मिळालेल्या गुणांच्या आधारे 10 हजार उमेदवारांची एक छोटी यादी तयार केली जाईल. 10 हजार शॉर्टलिस्ट केलेल्या उमेदवारांना लेखी चाचणी आणि आरोग्य चाचणीसाठी बोलावले जाईल. लेखी आणि वैद्यकीय परीक्षेत यशस्वी झालेल्या उमेदवारांची निवड आर्टिफिसर अप्रेंटिस एए आणि वरिष्ठ माध्यमिक भर्ती एसएसआर या पदांसाठी केली जाईल.
पदाचे नाव : आर्टिफिसर अप्रेंटिस AA आणि वरिष्ठ माध्यमिक भर्ती SSR – फेब्रुवारी 2022 बॅच
पद संख्या : 2500 जागा
शैक्षणिक पात्रता : दहावी आणि बारावी उत्तीर्ण
अर्ज पद्धती : ऑनलाईन
अर्ज सुरु होण्याची तारीख : 16 ऑक्टोबर 2021
अर्ज करण्याची शेवटची तारीख : 25 ऑक्टोबर 2021
अधिकृत वेबसाईट : www.indiannavy.nic.in
एसबीआय बँकेत 2 हजार 56 पदांसाठी भरती सुरू, त्वरित अर्ज करा
एसबीआय म्हणजेच स्टेट बँक ऑफ इंडिया अंतर्गत प्रोबेशनरी ऑफिसर पदाच्या एकूण 2 हजार 56 रिक्त जागा रिक्त आहेत. त्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. अर्ज हा ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. तसेच अर्ज करण्याची शेवटची तारीख 25 ऑक्टोबर 2021 आहे.
पदाचे नाव : प्रोबेशनरी ऑफिसर
पद संख्या : 2056 जागा
शैक्षणिक पात्रता : पदवीधर
नोकरी ठिकाण : मुंबई
वयोमर्यादा : 21 ते 30 वर्षे
अर्ज पद्धती : ऑनलाईन
अर्ज सुरु होण्याची तारीख : 05 ऑक्टोबर 2021
अर्ज करण्याची शेवटची तारीख : 25 ऑक्टोबर 2021
अधिकृत वेबसाईट : sbi.co.in
ऑनलाईन अर्ज करा : https://bit.ly/3lageaL