Wednesday, May 1, 2024

/

बांधकामाचे 40 हजाराचे स्टील लंपास

 belgaum

घराच्या बांधकामासाठी खरेदी केलेले सुमारे 40 हजार रुपये किमतीचे स्टील चोरट्यांनी लंपास केल्याची घटना राजाराम मार्ग चिदंबरनगर येथे उघडकीस आली आहे. तसेच अन्य दोन ठिकाणी अशाच स्वरूपाची चोरी झाल्याचे समजते.

याबाबतची माहिती अशी की, चिदंबरनगर येथील रहिवासी श्रीराम कट्टी हे घर बांधतात असून त्यासाठी त्यांनी 10 एमएमएस टाटा स्टील खरेदी करून राजाराम मार्ग येथील बांधकामाच्या ठिकाणी ठेवले होते. सदर सुमारे 40 हजार रुपये किंमतीचे स्टील चोरट्यांनी लांबविण्याचा प्रकार काल शुक्रवारी सकाळी निदर्शनास आला. यासंदर्भात श्रीराम कट्टी यांनी पोलिसात फिर्याद दिली आहे. चोरीची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला. याप्रकरणी उद्यमबाग पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद झाला असून पोलीस चोरट्यांचा शोध घेत आहेत. दरम्यान, चिदंबरनगर परिसरात अन्य दोन ठिकाणी या स्वरूपाचीच चोरी झाली असल्याचे समजते. मात्र पोलिसात काल रात्री उशिरापर्यंत त्याची नोंद झाली नव्हती.

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.