28 सप्टेंबर रोजी बेळगाव जिल्ह्यातील खानापूरमध्ये घडलेली घटना खळबळ माजवणारी आहे.अरबाज मुल्ला या तरुणाचा मृतदेह रेल्वे रुळावर फाटलेल्या आणि विस्कळीत अवस्थेत आढळला.त्यानंतर त्या तरुणाची प्रेम प्रकरणातून हत्या झाल्याचे उघड झाले.या प्रकरणाच्या तपासासाठी बैलहोंगल डीएसपीच्या नेतृत्वाखाली एक विशेष टीम तयार करण्यात आली आहे.
आरोपीला लवकरच अटक करून कठोर शिक्षा ठोठावण्यात यावी.अशी मागणी होत आहे. या संदर्भात मुस्लिम संघटना तसेच एम आय एम नेत्यांनीही पत्रकार परिषद घेऊन कारवाईची मागणी केली आहे.
खानापूरमध्ये मुस्लिम तरुणाची हत्या झाली आहे याची लवकरात लवकर कारवाई करा अन्यथा परिणाम वाईट होतील असा एमआयएम पक्षाच्या नेत्यांनी इशारा दिला आहे.
बुधवारपर्यंत आरोपी न सापडल्यास शुक्रवारी असदुद्दीन ओवेसी यांच्या नेतृत्वाखाली बेळगावात प्रचंड आंदोलन करण्यात येईल.असा इशारा एमआयएम नेता लतीफ खान पठाण यांनी एक निवेदन जारी करून दिला आहे.
बेळगावच्या आयजीपीसह एका वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याने तरुणांच्या हत्येच्या ठिकाणी भेट दिली.हत्येच्या प्रकरणाला आता वळण मिळत आहे. तपास गतिमान झाला आहे.