Thursday, December 19, 2024

/

मोर्चात शेकडोंच्या समवेत होणार सहभागी: नगरसेवक रवी साळुंके

 belgaum

महाराष्ट्र एकिकरण समितीच्या माध्यमातून सोमवार दिनांक 25 रोजी आयोजित भव्य मोर्चामध्ये शेकडो कार्यकर्त्यांच्या समवेत आपण सहभागी होणार असल्याची माहिती दक्षिण भागातील समितीचे नगरसेवक रवी साळुंखे यांनी दिली आहे.

नागरिकांनीही मराठी भाषिकांची भावना व भूमिका स्पष्टपणे मांडण्यासाठी या मोर्चामध्ये मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन रवी साळुंखे यांनी केले आहे.

रवी साळुंखे यांची आपल्या कार्यकर्त्यांसमवेत रविवारी विशेष बैठक झाली. राजहंस गडाच्या पायथ्याला भगवा ध्वज उंचावून त्यानी कार्यकर्त्यांच्या समवेत उद्याच्या मोर्चाला उपस्थित राहणार असल्याचे स्पष्टपणे सांगितले आहे.

रवी साळुंखे हे महाराष्ट्र एकीकरण समिती आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या माध्यमातून कार्य करणारे एक आघाडीचे कार्यकर्ते म्हणून मागील पंधरा वर्षापासून ओळखले जातात.ते त्यांच्या कार्याच्या जोरावर नगरसेवक म्हणून निवडून आले.Ravi salunke

यावेळी महाराष्ट्र एकीकरण समितीच्या नगरसेवकांची संख्या कमी असली तरी काही निवडक नगरसेवक निवडून आले असून त्यात रवी साळुंके यांनी आपल्या कामाच्या जोरावर आपल्या कर्तृत्वाचा वेगळा असा ठसा उमटवला आहे.

युवकांची फौज सीमाप्रश्नमध्ये घेऊन कायम आघाडीवर असलेल्या रवी साळुंखे यांनी सोमवारच्या मोर्चात भव्य आणि दिव्य पणे सहभागी होणार. तुम्ही या मी येतोय असे आवाहन केले आहे.यावेळी जोगनाथ गुंडकल,वैभव शिंदे,जतीन सुतार,प्रसाद पोटे,विशाल शिंदे, हृषीकेश भाकोजी,पवन हंडे,अमोल सुतार,अक्षय कंग्राळकर,अनिल शिंदे,सुमंत जाधव, रोशन शिंदे, आदी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.