Monday, May 6, 2024

/

संजय पाटील यांच्या त्या वक्तव्याविरोधात काँग्रेसची निदर्शने

 belgaum

माजी आमदार संजय पाटील मराठी माणसांवर पुन्हा एकदा घसरले आणि त्याविरोधात काँग्रेस पक्षाने त्यांच्या गोमटेश विद्यापीठाच्या समोर निदर्शने केली आहेत.

बेळगाव ग्रामीण च्या विद्यमान आमदार लक्ष्मी हेब्बाळकर आणि त्यांच्यात सध्या आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडत आहेत.या वादात संजय पाटील यांनी मराठी माणसांवर तोंडसुख घेतल्याने संताप वाढला आहे.आज निदर्शने करून त्यांचा निषेध नोंदवण्यात आला.

राकस्कोप क्रॉस नजिक पडलेल्या खड्ड्या संदर्भात एक बॅनर लावण्यात आला. त्या बॅनर मध्ये लक्ष्मी हेब्बाळकर यांच्यावर टीका करण्यात आली होती .बॅनर लागल्यानंतर लगेच बेळगाव ग्रामीण भाजपतर्फे ते खड्डे बुजवण्यात आले .या संदर्भात माध्यमानी छेडले असता तो बॅनर मात्र आपण लावला नसल्याचे आमदार संजय पाटील यांनी म्हटले .Congress protest

 belgaum

ते एवढे बोलून थांबले नाहीत तर असले घाणेरडे प्रकार भाजप कधीच करत नाही. रात्रीच्या वेळी बॅनर लावायची कामे मराठी माणसे करतात .असे उत्तर त्यांनी माध्यमांना दिल्यामुळे मराठी भाषिकात संताप वाढला आहे.

टीआरपी वाढवून घेण्यासाठी राष्ट्रीय पक्षांच्या उमेदवारांनी आपले उपद्व्याप सुरू केल्याची प्रतिक्रिया उमटत आहे.

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.