Saturday, April 27, 2024

/

त्या बालिकेचा अखेर मृत्यू

 belgaum

दोन वर्षीय बालिकेचा उसाच्या शेतात जाळून खून केल्याचा गंभीर प्रकार अथणी तालुक्यात उघडकीस आला आहे.

त्या चिमुरड्या बालिकेला बेळगावच्या सिव्हिल हॉस्पिटल मध्ये दाखल करण्यात आले होते पण उपचाराचा उपयोग न होता तिचा मृत्यू झाला असून खळबळ माजवणारी ही घटना आहे.

आज सकाळी अथणी जवळील एका शेतात त्या मुलीचा अर्धवट जळालेल्या अवस्थेतील मृतदेह सापडला होता. रुग्णवाहिकेतून तो मृतदेह लागलीच बेळगावला सिव्हिल हॉस्पिटल मध्ये आणण्यात आला.

 belgaum

मृत झाल्यावर हा मृतदेह सध्या जिल्हा शवागरात ठेवण्यात आला आहे.

अंधश्रद्धेतून ही घटना घडल्याचा संशय असून पोलीस पुढील तपास करीत आहेत. बालिकेला अशा प्रकारे संपविण्यात आल्यामुळे चर्चा होत असून संताप आणि हळहळ व्यक्त होत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.