आयटीआय ऑनलाईन परीक्षा रद्द करून ऑफलाईन परीक्षा घेण्यात याव्यात, अशी मागणी आयटीआय विद्यार्थ्यांनी केली आहे.गुरुवारी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चाद्वारे आलेल्या आयटीआय विद्यार्थ्यांनी आयटीआय परीक्षा ऑनलाईन पद्धतीने न घेता ऑफलाईन परीक्षा आयोजित करण्याचा आग्रह केला.
ऑनलाईन परीक्षेमध्ये आपल्याला अनेक समस्यांचा सामना करावा लागतो. यामुळे ऑफलाईन परीक्षा घेण्यात याव्यात, अशी मागणी जिल्हाधिकाऱ्यांकडे निवेदनाद्वारे करण्यात आली.
यावेळी रामदुर्ग येथील एका विद्यार्थ्याने सांगितले की सर्व्हरच्या समस्येमुळे ऑनलाईन परीक्षा देणे शक्य नाही. काल रात्री मी परीक्षा देण्यासाठी आलो होतो.
आणि कॉलेजसमोरच झोपी गेलो. सर्व्हरच्या समस्येमुळे परीक्षा पुढे ढकलण्याची विनंती केली. ही समस्या नेहमीच आम्हाला येत आहे. यासाठी आम्हाला ऑफलाईन परीक्षेची गरज आहे, अशी प्रतिक्रिया या विद्यार्थ्याने व्यक्त केली.
यावेळी मल्लप्पा दंडीन, अभिषेक गाणगेर, निखिल काळे, मुत्तुराज बजंत्री, शिवकुमार चौगुला, प्रमोद कुलगोड, मनोज कांबळे यांच्यासह इतर विद्यार्थी उपस्थित होते.