घटस्थापनेच्या निमित्ताने बेळगाव शहरात ठिकठिकाणी दुर्गामातेचे आगमन करून प्रतिष्ठापना केली जात आहे. कांगली गल्ली येथील एकता युवक मंडळाच्या मातेचे आगमन झाले असून नऊ दिवस मनोभावे पूजन केले जाणार आहे.
पारंपारिक पद्धतीने या गल्लीत दरवर्षी दुर्गामातेचा उत्सव साजरा केला जातो. त्या निमित्ताने कुंकुमार्चन, नवचंडिके हवन, कुमारिका पूजन, महाप्रसाद आदी कार्यक्रम होतात.
परिसरातील भाविक मोठ्या संख्येने या कार्यक्रमांना उपस्थित राहून देवीचा आशीर्वाद घेतात. एकता युवक मंडळाच्या माध्यमातून ते कार्यक्रम होत असतात अशी माहिती देण्यात आली आहे.
दसरोत्सवाचा आज पहिला दिवस आहे. या निमित्ताने बेळगाव शहर आणि परिसरात ठिकठिकाणी विधी पार पाडले जात आहेत. प्रत्येक ठिकाणी धार्मिक वातावरण आहे.
त्या धार्मिक वातावरणाचा लाभ घेण्यासाठी नागरिक एकवटले आहेत. कोरोना आणि इतर निर्बंध असले तरीही प्रामुख्याने नागरिक धार्मिक कारणासाठी एकवटत असून याचा अनुभव बेळगाव शहरात ठीक ठिकाणी येत आहे