सागर शिक्षण (बी.एड्.) महाविद्यालयात ‘स्वरांजली’ सुगमसंगीत कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. संगीत प्रा. विनायक मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली प्रशिक्षणार्थींनी विविध सुमधूर प्रार्थना गीते, भजने,भावगीते, भक्तीगीते, लोकगीते, सिनेगीते, देशभक्तीगीते उत्कृष्टपणे प्रस्तुत करून उपस्थितांची उत्स्फूर्त दाद मिळविली.
प्रारंभी विद्यार्थ्यांच्या प्रार्थना व स्वागतगीताने कार्यक्रमाची सुरुवात झाली. प्राचार्य आर. व्ही. हलब यांनी संगीताचे महत्त्व विशद केले. मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन करण्यात आले. त्यानंतर बीएड प्रशिक्षणार्थींनी विविधढंगी मराठी, हिंदी, कन्नड बहारदार गीते सुश्राव्यपणे प्रस्तुत करून सर्वांना मोहित केले.
यामध्ये श्रुति सरमळकर, क्रिस्तिना कलेबार, विद्याश्री पाटील, रेणूका थोरवत, सोनाली चोपडे, संजिवनी काकतकर, अश्विनी गावडे, स्वाती सुळगेकर, योगिता कटांबळे, चैताली सायनाक, ज्योती, माया मेलगे, पूजा गुरव, अश्विनी पाटील, स्टेफी डायस् यांनी गीतांचे सादरीकरण केले.
त्यांना हार्मोनियमवर विनायक मोरे, सिंथेसायझरवर शशिकांत लोहार व तबल्यावर संतोष पुरी यांनी उत्कृष्ट साथसंगत दिली.
प्रा.कल्पना धामणेकर यांनी आभार मानले.कार्यक्रमास सर्व प्राध्यापकवर्ग व प्रशिक्षणार्थी उपस्थित होते.