गेल्या लोकसभा पोटनिवडणुकीत सेवा बजावणाऱ्या 39 शासकीय कर्मचार्यांचा कोरोनामुळे मृत्यू झाला. तथापि त्यांच्या वारसदारांना आता 5 महिने लोटले तरी अद्याप भरपाई मिळालेली नाही. निवडणूकीची सेवा बजावताना मृत्यू पावल्यास 3 लाख रुपयांची नुकसानभरपाई जाहीर करण्यात आली आहे. मात्र त्याची अंमलबजावणी अद्याप झालेली नाही.
केंद्रीय मंत्री सुरेश अंगडी यांचे निधन झाल्यानंतर बेळगाव लोकसभेची पोटनिवडणूक घेण्यात आली. पोटनिवडणुकीत सेवा बजावणाऱ्या 39 शासकीय कर्मचाऱ्यांचा कोरोनामुळे मृत्यू झाल्याची नोंद आहे. त्याबाबतची यादी स्वतः जिल्हा निवडणूक विभागाने तयार केली आहे.
निवडणूक आयोगाकडे भरपाईसाठी प्रस्ताव देखील पाठविला आहे. तथापि 5 महिने लोटले तरी त्यावर कार्यवाही सुरू झालेले नाही. दरम्यान मृतांचे कुटुंबीय आणि वारसदार आन कडून पाठपुरावा सुरू आहे. परंतु केवळ आश्वासना पलीकडे त्यांना काही मिळाले नाही.
अर्जावर कार्यवाही सुरू असल्याबाबत कळविले जात आहे. लोकसभा पोट निवडणूक घोषित झाली त्यावेळी करण्याची दुसरी लाट सुरू होती. त्याला अनेकांनी आक्षेप घेतला होता. निवडणूक घेण्याची योग्य वेळ नसल्याचा आरोप करून निवडणूक रद्द करण्याची मागणीही केली होती.
परंतु सर्व विरोध डावलून निवडणूक घेण्यात आली. त्यामध्ये 39 जणांचा जीव गेला, परंतु आजतागायत त्या मोबदल्यात घोषित भरपाईही वारसदारांपर्यंत पोहोचलेली नाही.