Thursday, May 2, 2024

/

प्रोत्साहन देण्याचे कार्य करणारे कपिलनाथ युवक मंडळ

 belgaum

सामाजिक कार्यकर्ते,कोरोना योद्धा उद्योजक आणि पत्रकाराचा सत्कार करत कपिलनाथ युवक मंडळाने केवळ सामाजिक बांधिलकी जपली नाही तर लहान मुलांच्या कला गुणांना वाव देण्याचे काम वेगवेगळ्या स्पर्धांचे आयोजन करून केली आहे. कुणाचीही पाठ थोपटल्याने त्यांना प्रोत्साहन मिळते या भागांतील तरुणाईला ऊर्जा देण्याचे कपिल भोसले यांनी केलंय ते कौतुकास्पद आहे असे मत बेळगाव live चे संपादक प्रकाश बेळगोजी यांनी व्यक्त केले.

कोलकम्मा देवीच्या उत्सवा निमित्ताने विविध स्पर्धेमध्ये विजयी झालेल्या विजेत्यांचा बक्षीस वितरण आणि त्यांचा सत्कार स्वीकारल्या वर आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते.
यावेळी गेल्या लॉक डाऊन काळात यांनी स्वतःच्या जिवाची पर्वा न करता विविध क्षेत्रात कार्य केलेल्या कोरोना योद्यांचा व सामाजिक कार्यकर्त्यांचा उद्योजकांचा सत्कार करण्यात आला.

सदर कार्यक्रम तांगडी गल्ली येथे आयोजित केला होता.
कार्यक्रमाची सुरुवात उपस्थित मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून झाली नवनिर्वाचित नगरसेवक शंकर पाटील यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराज्यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले.

 belgaum

Kapinath yuvak mandal
त्यानंतर व्यासपीठावरील मान्यवरांचा सत्कार या भागातील कार्यकर्त्यांच्या हस्ते करण्यात आला. हेल्प फॉर निडीचे सुरेंद्र अनगोळकर,नगरसेवक शंकर पाटील,  नगरसेविका वैशाली भातकांडे ,मराठी नेते महादेव पाटील,बेळगाव live चे संपादक प्रकाश बेळगोजी उद्योजक महादेव चौगुले आणि वन टच फौंडेशनचे विठ्ठल पाटील यांचा सत्कार झाला.

यावेळी बोलताना महादेव पाटील म्हणाले की गेल्या 46 वर्षात मराठीसाठी सातत्याने आघाडीवर राहून महाराष्ट्र एकीकरण समितीचे कार्य निष्ठेने केलं आणि कोरोना काळात 45 दिवस कोविड सेंटर मध्ये काम केले त्याबद्दल जाहीर रित्या सत्कार हा प्रथमच झाला आहे हे आवर्जून सांगितले त्याबद्दल कपिल भोसले आणि त्यांच्या सहकाऱ्यांचे आभार मानले.

यावेळी नवनिर्वाचित नगरसेवक शंकर पाटील यांनी आपले विचार मांडताना सांगितले की मी नगरसेवक कमी पण समाजकार्यात अधिक काम करणार आहे.मी एक हिंदुत्ववादी कार्यकर्ता आहे.त्या कार्याबरोबरच मी समाजसेवेचे व्रत कधीच सोडणार नाही. महाराष्ट्र एकीकरण समितीचे युवा कार्यकर्ते सागर पाटील यांनी मराठी माणसाच्या लढ्याला कपिल भोसले सारख्या युवकाचे नेहमी सहकार्य आहे अल्पावधीतच भोसले व्यवसाय आणि समाज कार्यात युवकांत आपला ठसा उमटला आहे.श्री कोलकामा देवीचे महत्व शहरात पोचवण्यात त्यांचे मोठे योगदान असल्याचे नमूद केले.उद्योजक महादेव चौगुले यांनीही आपले मनोगत व्यक्त केले.विठ्ठल पाटील यांनी सूत्रसंचालन केले.

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.