राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना ऑक्टोबर महिन्याप्रमाणे आता नोव्हेंबरमध्ये देखील सलग सुट्ट्यांची परवानी लाभणार आहे. नोव्हेंबर महिन्याचे एकूण 30 दिवस असून यापैकी 10 दिवस सुट्टीचे वगळता 20 दिवस कामकाज चालणार आहे.
येत्या नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यात 4 रोजी नरकचतुर्दशी, 5 रोजी बलप्रदा, दुसऱ्या आठवड्यात 13 रोजी दुसरा शनिवार (सेकंड सॅटर्डे) आणि 14 रोजी रविवार, तिसऱ्या आठवड्यात 21 रोजी रविवार आणि 22 रोजी संत कनकदास जयंती,
चौथ्या आठवड्यात 27 रोजी चौथा शनिवार (फोर्थ सॅटर्डे) व 28 रोजी रविवार अशा सलग सुट्ट्या आल्या आहेत. सदर आठ सुट्ट्या वगळता 1 नोव्हेंबरला राज्योत्सव आणि 7 रोजी रविवारची सुट्टी असणार आहे. पहिल्या आठवड्यात 2, 3, 6 असे तीनच दिवस सरकारी कामकाज चालणार आहे.
ऑक्टोबर महिन्यातही पहिल्या आठवड्यात 2 व 3, दुसऱ्या आठवड्यात 9 व 10, तिसऱ्या आठवड्यात 14 व 15, चौथ्या आठवड्यात 19, 20 तसेच 23 व 24 या तारखांना सलग सुट्ट्या आल्या होत्या.
राज्य सरकारने आपल्या कर्मचाऱ्यांना महागाई भत्त्यामध्ये 3 टक्क्याने वाढ केली आहे. त्यातच नोव्हेंबरमध्ये सलग सुट्ट्यांची पर्वणी असल्याने राज्य सरकारी कर्मचाऱ्यांची यंदाची दिवाळी ही खऱ्या अर्थाने गोड होणार आहे.