कोरोना चे नियम आणि इतर अनेक कारणांमुळे यावर्षी दुर्गामाता दौड भव्य प्रमाणात होऊ शकलेली नाही. मागील वर्षाप्रमाणेच निवडक कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत दुर्गामाता दौड ला सुरुवात करण्यात आली.
केवळ पंधरा जणांना दौडीत पळण्याची परवानगी देण्यात आली आहे. मागील वर्षी प्रमाणे परंपरा म्हणून यावर्षी देखील दौड असणार आहे.
छत्रपती शिवाजी उद्यान येथून शिवमूर्तीचे पूजन करून दुर्गामाता दौड ला प्रारंभ झाला.आरती करण्यात आली. ध्वज चढवून आणि ध्येयमंत्र म्हणून दौड सुरू झाली.
शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान चे जिल्हाध्यक्ष किरण गावडे यांनी आवाहन केले की कोरोनाच्या नियमांमुळे निवडक कार्यकर्तेच दौडमध्ये सहभागी होऊ शकतील , इतर कार्यकर्त्यांनी उद्यानातच थांबावे. दौडच्या मागे पळू नये.
गल्लोगल्ली दौंडचे रांगोळ्या घालून स्वागत करण्यात आले. यावेळी नागरिकांनी दौडच्या मार्गावर स्वागताचा आपला पारंपरिक विधी पार पाडला.याचप्रमाणे पुढील दिवस दौड होणार असल्याची माहिती शिवप्रतिष्ठान हिंदुस्तान तर्फे देण्यात आली आहे.