Thursday, April 25, 2024

/

त्या दुर्घटनेतील मृतांना प्रत्येकी पाच लाख रुपये:मुख्यमंत्री

 belgaum

बेळगाव तालुक्यातील बडाल अंकलगी गावात एकाच कुटुंबातील सहा तर समोरच्या घरातील एक मुलगी असे एकूण सात जण घर कोसळून जागीच ठार झाल्याची दुःखद घटना काल घडली आहे.

या घटनेतील मृतांच्या नातेवाईकांना प्रत्येकी पाच लाख रुपये नुकसान भरपाई देण्याची घोषणा मुख्यमंत्री बसवराज बोम्माई यांनी केली आहे.

हिरेबागेवाडी पोलीस ठाण्यांतर्गत येणाऱ्या बडाल अंकलगी गावातील भीमाप्पा खनगावी यांचे घर कोसळले. त्यात सात जणांचा जागीच मृत्यू झाला आणि इतर तीन जण गंभीर जखमी झाले. या घटनेची खबर मिळताच मुख्यमंत्र्यांनी थेट भिमाप्पा यांच्याशी दूरध्वनीवरून चर्चा केली. तुमच्या दुःखात संपूर्ण राज्य सहभागी असून लवकरात लवकर नुकसानभरपाई देण्यात येईल अशी माहिती मुख्यमंत्र्यांनी त्यांना दिली.Badal anklgi

 belgaum

बागेवाडी पोलीस स्थानक आणि अग्निशामक दलाचे जवान सायंकाळी बडाल अंकलगी गावात दाखल झाले होते. ढिगारा उपसून मृतदेह बाहेर काढल्यानंतर एकाच कुटुंबातील सहा जणांवर पहाटे चार वाजण्याच्या सुमारास सामुदायिक अंत्यसंस्कार करण्यात आले आहेत. तर समोरच्या घरातील त्या मुलीवर आज अंत्यसंस्कार केले जाणार आहेत.

Cm talks with bhimappa
मुख्यमंत्री बोम्मई यांनी भिमाप्पा खणगावी यांच्याशी फोन वर बोलून केलं सांत्वन केली पाच लाख मदतीची घोषणा

संबंधित मुलीच्या बाबतीत ही घटना दुर्दैवी ठरली असून आपल्या मैत्रिणीबरोबर अभ्यास करण्यासाठी ती त्या घरात गेली होती. त्या ठिकाणी तिच्यावर हा प्रसंग गुदरला आहे.

पालक मंत्री गोविंद कारजोळ हेसुद्धा आज घटनास्थळी भेट देणार असून पुढील प्रक्रिया सुरू आहेत. दुर्घटना घडताच थेट मुख्यमंत्र्यांनी पीडितांना फोन केल्यामुळे पीडितांना तसेच प्रशासनालाही धीर आला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.