बेळगाव शहरातील रामतीर्थनगर येथे असलेल्या क्रिकेट स्टेडियमनजीक बेळगाव शहर विकास प्राधिकरण (बुडा) शॉपिंग कॉम्प्लेक्स आणि कम्युनिटी सेंटरची उभारणी करणार असून त्यासाठी निविदा काढण्यात आल्या आहेत.
रामतीर्थनगर येथील नियोजित शॉपिंग कॉम्प्लेक्स अर्थात व्यापारी संकुल स्कीम नं. 35 43 व 43ए मधील आरएस नं. 557 येथे बांधण्यात येणार आहे. हे संकुल बांधण्यासाठी सुमारे 2 कोटी 62 लाख 33 हजार रुपये खर्च येणार आहे.
व्यापारी संकुलातील दुकानांबाहेर फूड स्टॉल्ससाठी जागाही असणार आहे. याच ठिकाणी कम्युनिटी सेंटर अर्थात समुदाय भवनाची उभारणी केली जाणार असून त्यासाठी सुमारे 4 कोटी 37 लाख 31 हजार 240 रुपये खर्च अपेक्षित आहे.
समुदाय भवनाला तळमजला, त्यावरील तळमजला आणि पहिला मजला असणार आहे.