हुबळी येथे राज्यसभा सदस्य इराण्णा कडाडी यांनी घेतलेल्या आढावा बैठकीत, जीएम एसडब्ल्यूआर म्हणाले की, बेळगाव रेल्वे स्टेशनच्या पुनर्विकासाची कामे मार्च 2022 पर्यंत पूर्ण होतील.
राज्यसभा सदस्य इराण्णा कडाडी यांनी विशेष आढावा बैठक घेतली त्यावेळी रेल्वे सेवांच्या एकंदर प्रगतीचा आढावा त्यांनी घेतला. बेळगाव रेल्वे स्थानकाचा पुनर्विकास लवकरात लवकर पूर्ण होण्यासंदर्भात त्यांनी विचार विनिमर्श केला असता मार्च 2022 पर्यंत पुनर्विकास पूर्ण होईल अशी माहिती देण्यात आली आहे.
हुबळी ते मिरज दुहेरीकरण प्रगतीपथावर आहे आणि कामाची गती वाढवली जाईल, असे एसडब्ल्यूआर अधिकाऱ्यांनी बैठकीत सांगितले.
इराण्णा कडाडी यांनी रेल्वे अधिकाऱ्यांना विनंती केली की, दिवंगत रेल्वे राज्यमंत्री सुरेश अंगडी यांचे स्वप्न असलेल्या बेळगाव-कित्तूर-धारवाड रेल्वे मार्गाच्या कामाला गती द्यावी. यावेळी अधिकारी वर्गाने त्यांना चांगला प्रतिसाद दिला.
रेल्वे राज्यमंत्री सुरेश अंगडी यांनी आपल्या स्वप्नातील अनेक प्रकल्पांना मंजुरी मिळवून देण्याचे काम केले आहे .आता ती कामे लवकरात लवकर पूर्ण करण्याची आपली जबाबदारी आहे. यामुळे ही कामे आपण लवकरात लवकर पूर्ण करू या यासंदर्भात बैठकीत नियोजन करण्यात आले.