जयवंत साळुंके हे कलेच्या क्षेत्रातील एक नाव. बेळगाव शहरातील एक आर्टिस्ट. पोर्ट्रेट, रांगोळी, फोटोग्राफी कविता, अभिनय या साऱ्या क्षेत्रात त्यांनी आपली एक वेगळी ओळख बनविली आहे.
या नवरात्रीत त्यांनी रविवारी बदामावर कोल्हापूरच्या अंबाबाईचा मुखवटा साकारला आहे. अक्रालीक रंगांचा वापर करून त्यांनी केलेली ही किमया लक्षवेधी ठरली आहे.
लहानपणापासूनच त्यांना कलेचा छंद आहे. आवडीनं एक एक कलेत ते स्वतः माहीर होत गेले आणि त्यांनी आपली एक वेगळी ओळख तयार केली.बदाम मध्ये कोल्हापूरची अंबाबाई साकारण्यासाठी पाऊण तास लागला अशी माहिती त्यांनी दिली.
स्वतःच्या घरी स्वतःच गणपती मूर्ती बनवून शेडू मध्ये बनविलेली मूर्ती ते घरीच विसर्जित करतात.त्यांचे मेडिकल शॉप आहे.
सामाजिक सेवा ते करतातच शिवाय बेळगाव जिल्हा रिटेल फार्मसी असोशियशनचे अध्यक्ष आहेत. कलामहर्षी कै.के बी कुलकर्णी आर्ट फौंडेशन चे संचालकही आहेत.