बेळगावच्या लेखिका आदिती पाटील यांनी लिहिलेल्या पॅट्रीआरकी अँड द पेंगोलिन या इंग्रजी पुस्तकाला भारतीय लेखिकाकडून लिहिलेल्या पुस्तकांमध्ये टॉप टेन चा बहुमान मिळाला आहे.
आदिती यांनी विनोदी आणि व्यंगात्मक शैलीने पुस्तकांमध्ये आपल्या देशातील पुरुष प्रधान संस्कृती , जातीभेद, विलुप्त होत जाणारे वन्यजीव आदी बाबत असलेली राजकीय उदासीनता यांचे विवरण केले आहे.
आदित्य पाटील या मूळच्या बेळगावच्या आहेत. सध्या आसाम राज्यातील गुवाहाटी येथे कार्यरत आहेत .वडिलांच्या नोकरीमुळे संपूर्ण देशभरात त्यांचे वास्तव्य आणि शिक्षण झाल्यामुळे विविध संस्कृती त्यांना पाहता आली. एक नामवंत लेखिका म्हणून प्रसिद्ध आहेत.
लहानपणापासून विविध पुस्तके वाचली. संशोधन करीत असताना पुस्तक लिहिण्याचा निर्णय घेतला. निसर्ग संवर्धन व संरक्षण प्रकल्पांवर काम केले, त्याचाही चांगला लाभ झाला.
तसेच कोलंबिया विद्यापीठाने व गुजरात वन खात्याने काम करण्याचा अनुभव व संधी दिल्यामुळे त्याचा उपयोग या लेखनात होत असल्याची माहिती आदिती पाटील यांनी दिली आहे.