Sunday, December 22, 2024

/

आज -उद्या शहराच्या पाणी पुरवठ्यात व्यत्यय

 belgaum

बेळगाव शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या हिडकल जलाशयाच्या जलवाहिनीच्या दुरूस्तीचे काम हाती घेण्यात आले असल्यामुळे आज व उद्या शुक्रवार दि. 17 सप्टेंबर रोजी शहराच्या पाणीपुरवठ्यात व्यत्यय निर्माण होणार आहे.

शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या हिडकल जलाशयात ते बसवनकोळ दरम्यान असलेल्या जलवाहिनीला कणबर्गीनजीक लागलेल्या गळतीची आज दुरुस्ती केली जाणार आहे. या कारणास्तव आज व उद्या दोन दिवस 24 तास पाणी पुरवठा योजनेस विविध भागातील पाणीपुरवठ्यात व्यत्यय येणार आहे, असे एल अँड टी कंपनीने एका प्रसिद्ध पत्रकाद्वारे कळविले आहे.

दरम्यान, खानापूर शहराला पाणीपुरवठा करणारी मुख्य जलवाहिनी मासळी मार्केट जवळ फुटल्याने या जलवाहिनीच्या दुरुस्तीचे काम देखील तातडीने हाती घेण्यात आले आहे.

परिणामी आज व उद्या शुक्रवार दि. 17 सप्टेंबर रोजी खानापूर शहराला नळाद्वारे पाणीपुरवठा होणार नाही याची शहरवासीयांनी नोंद घ्यावी, असे आवाहन नगराध्यक्ष मजहर खानापुरी व मुख्याधिकारी विवेक बन्ने यांनी केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.