Saturday, January 11, 2025

/

दुचाकीची ट्रकला धडक-दोघे युवक ठार

 belgaum

हायवेवर रस्त्याच्या बाजूला थांबलेल्या ट्रकला दुचाकीने जोराची धडक दिल्याने दोन महा विद्यालयीन विध्यार्थी घटनास्थळी ठार झाले आहेत. पुणे बंगळुरू राष्ट्रीय महामार्गावर बर्डे धाब्या शेजारी बुधवारी मध्यरात्री बाराच्या दरम्यान ही दुर्घटना घडली आहे.

श्रीनाथ दिगंबर पवार वय 21 रा. चव्हाट गल्ली बेळगाव आणि रचित रंजन डूमावत वय 21 सदाशिवनगर बेळगाव अशी अपघातात मयत झालेल्या युवकांची नावे आहेत.

घटनास्थळावरून मिळालेल्या माहितीनुसार श्रीनाथ आणि रचित हे दोघेही रात्री धाब्यावर जेवण करून बेळगावकडे परतत होते त्यावेळी पंक्चर काढण्यासाठी रस्त्याच्या कडेला थांबलेल्या ट्रकला जोराची धडक दिली या अपघातात दोघांनाही इतकी गंभीर दुखापत झाली घटनास्थळी त्यांचा मृत्यू झाला.रहदारी उत्तर पोलीस स्थानकात घटनेची नोंद झाली आहे.Shrinath pawar

दोघेही मयत युवक चांगले मित्र होते रात्री जेवणासाठी ते हायवेवर धाब्यावर गेले होते लिंगराज कॉलेज मध्ये बी कॉम च्या अंतिम वर्षात ते शिकत होते.

ऐन गणपती उत्सवाच्या तोंडावर अपघातात दोन्ही युवक अचानकपणे मयत झाल्याने चव्हाट गल्ली आणि सदाशिवनगर परिसरावर शोककळा पसरली आहे.श्रीनाथ पवार हा चव्हाट गल्लीतील प्रतिष्ठित नागरिक आणि मराठा को ऑप बँकेचे अध्यक्ष दिगंबर पवार यांचा चिरंजीव होता.

गुरुवारी सकाळी अकरा वाजता चव्हाट गल्ली स्मशानभूमीत श्रीनाथ वर अंतिम संस्कार केले जाणार आहेत.

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.