हेस्कॉमकडून तातडीचे दुरुस्तीचे काम हाती घेण्यात येणार असल्यामुळे रविवार दि. 5 सप्टेंबर रोजी सकाळी 10 ते दुपारी 4 वाजेपर्यंत बेळगाव शहरातील वीज पुरवठा खंडित केला जाणार आहे.
तातडीच्या दुरुस्तीच्या कारणास्तव रविवारी उपरोक्त वेळेत कॅन्टोन्मेंट, नानावाडी, हिंदवाडी, मारुती गल्ली, बेळगाव शहर, टिळकवाडी,
एमईएस कॅम्प, शहापूर, जक्किरीहोंडा, मराठा कॉलनी, कपिलेश्वर कॉलनी, आरपीडी, केएलई, उद्यमबाग, मजगाव, हुलियार, 110 केव्ही कणबर्गी, एक्झिबिशन सेंटर यमुनापूर,
आयुर्वेदिक कॉलेज, कणबर्गी, रामतीर्थनगर, शिवालय, महांतेशनगर, शिवाजीनगर, 110 केव्ही उद्यामबाग, कुमारस्वामी ले आऊट, सह्याद्री कॉलनी, 33 केव्ही केएलई एचटी,
36 केव्ही युके -27, इंडाल, वैभवनगर, शिवबसव नगर व सुभाषनगर या भागातील वीज पुरवठा खंडित केला जाणार आहे. तरी नागरिकांनी याची नोंद घेऊन सहकार्य करावे, असे आवाहन हेस्काॅमने केले आहे.