बेंगलोर येथील बसवणगुडी एक्वेटिक सेंटर येथे नुकत्याच पार पडलेल्या कर्नाटक राज्य कनिष्ठ अजिंक्यपद जलतरण स्पर्धेत बेळगावच्या इमानी जाधव हिने घवघवीत यश संपादन केले आहे
इमानी जाधव ही शहरातील केएलएस शाळेमध्ये इयत्ता दहावीमध्ये शिकत आहे. बसवणगुडी एक्वेटिक सेंटर येथे आयोजित राज्यस्तरीय कनिष्ठ अजिंक्यपद जलतरण स्पर्धेत इमानी जाधव हिने 50 मी. आणि 200 मी. बॅकस्ट्रोक शर्यतीमध्ये कांस्य पदक मिळविले आहे.
त्याचप्रमाणे 4×200 मी. फ्रीस्टाइल रिलेमध्ये कांस्य तर 4×100 मीटर फ्रीस्टाइल रिलेमध्ये रौप्य पदक पटकाविले आहे. ती सध्या बेंगलोर येथील पदुकोण द्रविड सेंटर फॉर स्पोर्ट्स एक्सलन्सी येथील डॉल्फिन एक्वेटिक येथे निहार आमीन आणि युर्वेश दुबे या प्रशिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली जलतरणाचा सराव करत आहे.
तिला तिच्या आई-वडिलांसह केएलएस शाळेच्या प्राचार्या श्रीमती नंदिनी मुतालिक देसाई, श्रीमती सारिका नाईक आणि शिक्षक वर्गाचे प्रोत्साहन लाभत आहे. उपरोक्त यशाबद्दल इमानी जाधव हिचे शाळेसह सर्वत्र अभिनंदन होत आहे.