सक्षम या सामाजिक सेवा संघटनेतर्फे बेळगावातील तरुण महिला आणि ज्येष्ठ नागरिकांसाठी खास बाप्पा मोरया प्रदर्शन आयोजित केले आहे.
*कालावधी*: मंगळवार दि 7 ते शुक्रवार दि 10 सप्टेंबर
*वेळ*: रोज सकाळी 10 ते रात्री 8
*स्थळ*: वरेरकर नाट्यगृह, हेरवाडकर शाळेजवळ, दुसरे रेल्वेगेट, टिळकवाडी
कोरोनाचा काळ बिकट गेला. आपल्या अंगभूत कला तशाच दडपून ठेऊन आर्थिक आणि वैयक्तिक नुकसान सोसत बराच काळ वाटचाल झाली. यामुळेच सक्षम ही समाजसेवी संस्था देत आहे संधी आपले कलागुण आपले व्यवसाय यांचा श्रीगणेशा करण्याची
गणेशोत्सवाच्या निमित्ताने सक्षम आयोजित करीत आहे, *बाप्पा मोरया प्रदर्शन*
यामध्ये सहभाग घेऊन महिला, तरुण आणि वयोवृद्ध नागरिकांना करता येणार *कलात्मक वस्तू, खाद्यपदार्थ,सजावटीचे साहित्य, हस्तकला,घरगुती स्वरूपात बनविलेले दागिने आणि मखर सारख्या गणेशोत्सवाला लागणाऱ्या वस्तूंचे प्रदर्शन आणि विक्री.*
*इको फ्रेंडली आणि मातीच्या तसेच घरच्या घरी विसर्जित करता येणाऱ्या श्री मूर्तीही या प्रदर्शनात मांडल्या जाणार आहेत*
*सक्षम या संस्थेचा जन्म झाला आहे बेरोजगार तरुण,महिला आणि गरजू वयोवृद्धांना सक्षम बनविण्यासाठी.*
*आपला सहभाग नोंदविण्यासाठी संपर्क करा.* 8073324496 या क्रमांकावर.
आपल्या स्टॉल बद्दल सोशल मीडियावर माहिती सांगून प्रदर्शन काळात व इतर वेळीही ग्राहकांना आकर्षित करण्याची संधी मिळेल