बेळगाव आरपीडी सर्कलमध्ये राजवीरा मदकारी लीडर सर्कल असे नामकरण केले जाणार आहे. यासाठी काही तरुण जमले असून पोलीस बंदोबस्तात वाढ करण्यात आली आहे. वीर मदकारी फॅन द्वारे हा फलक लावण्यात येणार आहे अशी माहिती मिळाली आहे.
श्री राजवीर मदकारी नायक यांचे नाव लिहिलेली कन्नड, मराठी आणि इंग्रजी मध्ये लिहिलेली नेमप्लेट याठिकाणी लावण्यात येणार आहे.
लीडर कम्युनिटी युथ द्वारे नामांकित व्यक्तीचा नामकरण सोहळा आयोजित केला असून पोलीस बंदोबस्त वाढविण्यात आला आहे.
20 पेक्षा जास्त तरुण जमल्याने पोलिसांची डोकेदुखी वाढली आहे.पोलीस अनधिकृतपणे आलेल्या व्यक्तींची चौकशी करीत आहेत.
परवानगी मिळवण्याची आणि प्रशासनाकडे अर्ज करण्याच्या सूचना पोलिसांनी दिल्या आहेत.अर्ज वगैरे करणार नाही अशी भूमिका घेतलेल्या व विरोध करणाऱ्या तरुणांना पोलिसांनी शांत करण्याचा प्रयत्न सुरू केला आहे.