महानगरपालिकेच्या निवडणुकीसाठी उद्या अर्थात 3 सप्टेंबर रोजी मतदान होणार आहे. या संदर्भात बेळगाव पोलीस आयुक्तालयातर्फे निर्भयपणे आणि निष्पक्ष निवडणूक घेण्याची व्यवस्था करण्यात आली आहे.
एकूण 6 केएसआरपी प्लाटून, 300 होमगार्ड, 75 अतिरिक्त कर्मचारी महानगरपालिका निवडणूक बंदोबस्तासाठी नियुक्त केले जाणार आहेत.
सर्व व्यवस्था पूर्ण करण्यात आल्याचे डीसीपी डॉ विक्रम आमटे यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले आहे.
निवडणुकीत अनेक गैरप्रकार होऊ शकतात. बोगस मतदान, संवेदनशील मतदान केंद्रांवर गोंधळ तसेच दोन गटात हाणामाऱ्या आणि मारहाण अश्या घटना यापूर्वी घडलेल्या आहेत.
असे प्रकार होऊ नयेत आणि निवडणूक शांततेत पार पडली जावी यासाठी सर्व व्यवस्था चोख केली जाणार आहे.
कोणीही गैरप्रकार करून कायदा हातात घेण्याचा प्रयत्न झाल्यास गय केली जाणार नाही असा इशारा देण्यात आला आहे.