Monday, November 25, 2024

/

बेळगाव जिल्ह्यात फक्त एकमेव पॉझिटिव्ह

 belgaum

सप्टेंबर महिन्याच्या पहिल्या दिवशी 1 तारखेला बेळगाव जिल्ह्यात फक्त एकमेव पॉझिटिव्ह रुग्ण आढळल्यामुळे समाधानकारक चित्र आहे. बेळगाव जिल्ह्यात एकूण कोरोना बाधितांची संख्या 79 हजार 236 इतकी झाली असून त्यापैकी 78 हजार 21 कोरोना मुक्त झाले आहेत. बुधवारी जिल्ह्यातून एकही कोरोना मुक्त झालेला नसून सध्या 324 जण उपचारांमध्ये आहेत.

बुधवारी एकही मृत्यू झालेला नसला तरी बेळगाव जिल्ह्यात सध्या एकूण मृतांची संख्या 191 इतकी झाली आहे.बेळगाव जिल्हा कोरोना बुलेटीन प्राप्त झाले असून बेळगाव जिल्ह्याच्या आकडेवारीत समाधानकारक स्थिती आहे .

केवळ एक पॉझिटिव्ह रुग्ण मिळाल्याने वेगवेगळ्या वेगळ्या प्रकारे नियम शिथिल करण्यात आले आहेत. शनिवारी आणि रविवारी होणारा नाईट कर्फ्यु सुद्धा रद्द करण्यात आल्यामुळे व्यापारी वर्गात समाधानाचे वातावरण निर्माण झाले आहे.

गणेशोत्सवाच्या निमित्ताने आणखी काय नियम व अटी मिळतात ते स्पष्ट नाही मात्र नागरिकांसमोर संभ्रमाचे वातावरण आहे.

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.