बेळगाव ची सुकन्या डॉक्टर नम्रता सुभाष देसाई ही कृष्णा इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्स कराड येथे गेल्या जून 2020 पासून एमडी मेडिसिन हा कोर्स करित आहे .
तिने निवासी डॉक्टर म्हणून केलेल्या कार्याचा गौरव भारताचे दळणवळण व रस्ते बांधणी मंत्री श्री नितिन गडकरी यांच्या हस्ते करण्यात आला.
कोरोना काळात कृष्णा इन्स्टिट्यूटने अनेक कोरोना रुग्णांची सेवा करून त्यांना जीवदान दिले या कार्यात भरीव योगदान दिलेल्या क. डॉक्टर नम्रता सुभाष देसाई यांच्या बरोबरच डॉक्टर सुशील घारगे, निखिल पाटील सन्मानित करण्यात आले.
डॉक्टर नम्रता चा नितीन गडकरी यांनी सन्मानपत्र देऊन विशेष गौरव केला. कुमारी नम्रता हिने सेंट जोसेफ मधून दहावीपर्यंतचे शिक्षण पूर्ण केले असून जी एस एस महाविद्यालयातून तिने पीयूसी केली व जवाहरलाल नेहरू मेडिकल महाविद्यालयातून तिने एम बी बी एस ही पदवी घेतली आहे .सुरुवातीपासूनच ती एक हुशार व कष्टाळू विद्यार्थिनी म्हणून ज्ञात आहे.
येथील आधार सहकारी सोसायटीचे चेअरमन व उद्योजक सुभाष देसाई यांची ती कन्या होय याबद्दल तिचे सर्वत्र कौतुक होत आहे. या कार्यक्रमास माजी मंत्री चंद्रकांत दादा पाटील व संस्थेचे अध्यक्ष डॉक्टर सुरेश भोसले हेही उपस्थित होते