यंदाच्या 2021 -22 सालातील ‘आजादीका अमृत महोत्सव’ दिनानिमित्त येत्या 28 सप्टेंबरपासून बेळगाव तालुक्यातील सर्व श्वानं अर्थात कुत्र्यांसाठी रॅबीज प्रतिबंधक लसीकरण मोहीम राबविली जाणार आहे.
पशुपालन आणि पशुवैद्यकीय खात्यातर्फे येत्या 28 सप्टेंबरपासून दररोज सकाळी 9 ते दुपारी 12 वाजेपर्यंत वडगाव येथील पशु चिकित्सालयामध्ये लसीकरणाचा हा कार्यक्रम आयोजित केला जाणार आहे.
तरी शहरासह तालुक्यातील सर्व श्वानप्रेमींनी आपल्या श्वानांच्या रेबीज लसीकरणासाठी या कार्यक्रमाचा लाभ घ्यावा, असे आवाहन पशुपालन आणि पशुवैद्यकीय खात्यातर्फे एका प्रसिद्धिपत्रकाद्वारे करण्यात आले आहे.