Thursday, April 25, 2024

/

नोकरीवर जाण्यास निघालेला क्लार्क बेपत्ता

 belgaum

बेळगाव तालुक्यातील मच्छे येथील  रहिवाशी आणि भारतीय सैन्यात क्लार्क पदावर सेवा बजावणारे नितीन शंकर राऊत हे बेपत्ता झाले आहेत.

मच्छे येथील गोडसे कॉलनीचे रहिवासी नितीन शंकर राऊत हे भारतीय सैन्यात क्लार्क म्हणून उत्तराखंडमधील हलधोनी येथे सेवा बजावतात. १९ सप्टेंबर २०२१ रोजी ते घरातून कामाच्या ठिकाणी रुजू होण्यास निघाले होते. मात्र त्यानंतर ते बेपत्ता झाले असून, त्यांचा ठावठिकाणा समजू शकलेला नाही.

बेपत्ता झालेल्या नितीन राऊत यांची उंची ५.५ असून, शरीरयष्टी साधारण आहे. त्यांचा रंग गोरा, चेहरा उभट आणि लांब नाक आहे. ते हिंदी आणि मराठी भाषा बोलतात.

 belgaum

त्यांच्याबाबत काही माहिती मिळाल्यास बेळगाव रेल्वे पोलीस ठाणे दूरध्वनी क्र. ०८३१-२४०५२७३ किंवा मो. क्र. ९४८०८०२१२७ वर संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.