हुक्केरी तालुक्यातील गुडस ग्रामपंचायतीच्या एका क्लार्कला लाच स्वीकारताना भ्रष्टाचार निर्मूलन दलाच्या (एसीबी) अधिकाऱ्यांनी सापळा रचून रंगेहात पकडले.
गुडस ग्रामपंचायतीमध्ये क्लार्क आणि बिल कलेक्टर म्हणून काम करणारा सिधगौडा बसवन्ना नेर्ली हा 7,400 रुपयांची लाच स्वीकारताना एसीबी अधिकाऱ्यांच्या जाळ्यात सापडला.
मालमत्ता रजिस्टरमध्ये वारसाचे नांव चढविण्यासाठी नेर्ली याने एका अर्जदाराकडे 7400 रुपयांची लाच मागितली होती. याबाबत अर्जदार भिमाप्पा कलकुटगी यांनी एसीबी कडे तक्रार दाखल केली होती.
या तक्रारीची दखल घेऊन एसीबीच्या अधिकाऱ्यांनी सापळा रचून नेर्ली याला रंगेहात पकडले. एसीबी पोलीस प्रमुख बी. एस. न्यामगौडर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस प्रमुख करुणाकर शेट्टी यांच्या नेतृत्वाखाली पोलीस निरीक्षक गळाद अडिवेश गुडीगोप्प, सुनील कुमार आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी उपरोक्त कारवाई केली.