बेळगाव महानगरपालिका निवडणुकीत प्रवेश केलेल्या आम आदमी पक्षाने आता बेळगाव जिल्हा पंचायत आणि तालुका पंचायत निवडणुकीत ही सहभाग घेण्याचा निर्णय घेतला आहे. आम आदमी पक्षाचे जिल्हा अध्यक्ष विजय पाटील यांनी या संदर्भात पत्रकारांना माहिती दिली आहे .
जिल्हा पंचायत आणि तालुका पंचायत निवडणुकीच्या माध्यमातून आम्ही जनतेला प्रामाणिक आणि भ्रष्टाचारमुक्त प्रशासन देण्याचा प्रयत्न करणार असल्याचे त्यांनी सांगितले. नुकतीच बेळगाव महानगर पालिकेची निवडणूक सत्तावीस वॉर्डातून आम आदमी पक्षाने लढवली. मात्र अपेक्षित यश मिळाले नाही. निवडणुकीचा एक वेगळा अनुभव आपल्याला मिळाला असे त्यांनी सांगितले आहे.
जिल्हा पंचायत आणि तालुका पंचायतीच्या मतदारसंघांसाठी उमेदवार निवडीची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. अनेक लोक पक्षाच्या संपर्कात आहेत. दिल्ली येथे आम आदमी पक्षाच्या सरकारने केलेली कामे पाहून अनेक जण या पक्षाशी संलग्न होत आहेत. त्यामुळे प्रामाणिक आणि भ्रष्टाचारमुक्त उमेदवाराला उभे करून चांगले प्रशासन देण्याचा आपला प्रयत्न असल्याचे त्यांनी सांगितले .
मागील 16 वर्षांमध्ये बेळगाव शहर आणि परिसरातील विकासाची प्रक्रिया ठप्प झाली आहे .हा विकास व्हायचा असेल तर चांगले लोक निवडून येण्याची गरज आहे .असे त्यांनी सांगितले आहे.
अरविंद कबाडिया आणि अनिस सौदागर हे आपचे सदस्य यावेळी उपस्थित उपस्थित होते.