श्रावण मासानिमित्त विष्णू गल्ली, वडगाव येथील श्री विष्णू मंदिरामध्ये आज मंगळवारपासून सलग दहा दिवस दररोज सायंकाळी 7 ते रात्री 9 वाजेपर्यंत श्रीमद् भागवत आधारित दशावतार कथा कथन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
कोरोना संदर्भातील सर्व नियमांचे पालन करून या कार्यक्रमाचे आयोजन केले जाणार असून पु. श्री. गिरिवर दास हे श्रीमद् भागवत आधारित दशावतार कथा कथन करणार आहेत.
श्रावण मासानिमित्त होणाऱ्या या कार्यक्रमाच्या समाप्तीनंतर दररोज तीर्थ प्रसादाचे वाटप केले जाणार आहे.यानिमित्ताने एक लाख तुळशी दल अर्पण करण्यात येणार आहे.
त्याचप्रमाणे सलग दहा दिवस चालणाऱ्या या कथाकथन कार्यक्रमाच्या शेवटच्या दिवशी श्री लक्ष्मी-नारायण यांचे एक लाख तुळशी पूजन होणार आहे. तरी भाविकांनी या कथाकथन कार्यक्रमाचा लाभ घ्यावा, असे आवाहन आयोजकांतर्फे करण्यात आले आहे.