कोरोना प्रादुर्भावाचा पार्श्वभूमीवर राज्यात दोन टप्प्यात शाळा सुरू केल्या जातील. त्यापैकी पहिल्या टप्प्यातील शाळांना 23 ऑगस्ट रोजी प्रारंभ होणार असल्याचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी स्पष्ट केले आहे.
बेंगलोर येथे शुक्रवारी प्रसिद्धिमाध्यमांशी बोलताना मुख्यमंत्री बोम्मई म्हणाले की, पहिल्या टप्प्यात 23 ऑगस्टपासून शाळा प्रारंभ होतील. या पहिल्या टप्प्यात इयत्ता 9 वी, 10 वी, 11 वी आणि 12 वीचे वर्ग सुरू केले जातील.
त्याचप्रमाणे इयत्ता पहिली ते आठवीपर्यंतचे शालेय वर्ग केंव्हा सुरू करायचे याबाबत विचारविनिमय करून निर्णय घेतला जाईल.
ऑगस्ट अखेरपर्यंत कोरोना परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन या बाबतचा निर्णय घेतला जाईल, असेही मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले आहे.