बेळगावच्या सह्याद्री नगर भागात घरफोडीच्या प्रयत्नातील एकास अटक करण्यात यश आले आहे. यामुळे घरफोडीचे प्रकरण उघडकीस आले आहे.परिसरातील नागरिकांनी संशय आल्यावरून एका व्यक्तीला पकडून पोलिसांच्या स्वाधीन केले.
बेळगावात चोरीच्या घटनांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. गुरुवारी सायंकाळी सातच्या सुमारास सह्याद्रीनगर येथील बसवराज दुगानावरा यांच्या घरात तीन व्यक्तींनी प्रवेश केला. त्यापैकी एक घराच्या बाहेर पहारा देत होता.
समोरच्या घरातील व्यक्तीला या माणसाच्या वागण्याचा संशय आला, आणि त्याने संभाषण साधण्याचा प्रयत्न केला. यामुळे ते तिघेही घाबरले आणि पळून गेले.
नागरिकांनी एका संशयिताला ताब्यात घेऊन एपीएमसी पोलिसांच्या ताब्यात दिले. स्थानिकांकडून मिळालेल्या माहितीनुसार हे सर्व लोक अल्पवयीन आहेत. पोलिसांचा तपास सुरू आहे.