जीवघेण्या मेंदूच्या दुखापतीशी लढणाऱ्या एका गरीब शेतकऱ्याने आपले अवयव दान केले आणि 4 लोकांचे प्राण वाचवण्याचे आदर्श काम केले आहे. एक गरीब शेतकरी मेला पण चौघांना वाचवून गेला आहे.
डॉ प्रभाकर कोरे हॉस्पिटल आणि मेडिकल रिसर्च सेंटर येथे, जीवघेण्या मेंदूच्या दुखापतीशी लढणाऱ्या एका गरीब अवस्थेतून आलेल्या शेतकऱ्याने आपले अवयव दान केले आणि 4 व्यक्तींचे जीव वाचविले आहेत.
त्याचे यकृत हुबळी येथून बेंगळूरला विमानाने पाठवण्यात आले, तर किडनी प्रत्येकी हुबळी आणि धारवाड हॉस्पिटलला दान करण्यात आली.
एका उदात्त कार्यात, पोलीस जीवनरक्षक म्हणून पुढे आले कारण त्यांनी बेळगाव ते हुबळी विमानतळापर्यंत ग्रीन कॉरिडॉर बनवला आणि 55 मिनिटांच्या काळात यकृत पोहोचविण्यास मदत केली.
पोलीस अधिकाऱ्यांनी ग्रीन कॉरिडॉर इतक्या चांगल्या प्रकारे व्यवस्थापित केले की रुग्णवाहिकेला कोठेही थांबावे लागले नाही आणि अपेक्षित वेळेच्या 5 मिनिटांपूर्वी 55 मिनिटांमध्ये हुबळी विमानतळावर यकृत पोहोचले.तेथून यकृत बंगळुरूला नेण्यात आले.
वाहन अपघातात गोकाक तालुका येथील 50 वर्षीय व्यक्ती गंभीर जखमी झाला. मेंदूला गंभीर दुखापत झाल्यामुळे त्याला अर्धांगवायू झाला आणि त्याचा मेंदू थांबला. पण अवयव काम करत होते.
त्याला ब्रेन डेड घोषित केल्यानंतर भाऊ, पत्नी आणि कुटुंबातील सदस्यांशी सल्लामसलत केल्यानंतर, KLE मधील कर्मचारी कुटुंबाला त्याचे अवयव दान केले जाऊ शकतात हे पटवून देण्यात यशस्वी झाले आणि कुटुंबाने सहमती दर्शविली.
केएलई रोटरी स्किन बँक ने केएलई डॉ प्रभाकर कोरे हॉस्पिटलमधील नेत्र बँकेला त्वचा व डोळे दान केले.त्वचा जळलेल्या रुग्णांसाठी त्वचेचे कलम केले जाते आणि दोन अंधांना डोळे प्रत्यारोपित केले जाणार आहेत.
सामाजिक, आर्थिक आणि शैक्षणिकदृष्ट्या वंचित शेतकऱ्याने अर्थात त्याच्या कुटुंबीयांनी अवयव दानाद्वारे आदर्श निर्माण केला आहे.बेळगाव आणि हुबळी पोलीस विभागाचे कार्य अत्यंत स्तुत्य आहे.
डॉ प्रभाकर कोरे हॉस्पिटलच्या प्रत्यारोपण विभागाचे डॉ नेर्ली, डॉ. रितेश वेर्णेकर, बीजीएस ग्लोबलचे डॉ.सुनील शेणवी आणि टीम, प्रत्यारोपण समन्वयक प्रमोद सुळीकेरी, नीरज दीक्षित, आरजी पाटील, विनायक पुराणिक, मनोज नाईक आणि इतरांनी प्रत्यारोपणाची प्रक्रिया सुलभ केली.