कोरोनाच्या संभाव्य तिसऱ्या लाटेचा यशस्वी मुकाबला करण्यासाठी जिल्हा प्रशासन, जि. पं. बेळगाव, आरोग्य व कुटुंब कल्याण खाते, शिक्षण खाते, महिला व बाल विकास खाते, बेळगाव महापालिका आणि तालुका आरोग्य अधिकारी कार्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ‘नंदन वात्सल्य’ या मुलांच्या आरोग्य तपासणी कार्यक्रमाचा आजपासून शुभारंभ झाला.
वडगाव येथील शाळा क्र. 14 येथे नंदन वात्सल्य या मुलांच्या आरोग्य तपासणी कार्यक्रमाचा जिल्हास्तरीय उद्घाटन समारंभ आज गुरुवारी सकाळी पार पडला. प्रमुख पाहुणे जिल्हा आरोग्य व कुटुंब कल्याण अधिकारी डाॅ. एस. व्ही. मुन्याळ यांच्या हस्ते कार्यक्रमाचे उद्घाटन झाले. यावेळी विद्यार्थिनींच्या हस्ते झाडाच्या रोपट्याला पाणी घालून कार्यक्रमाचा शुभारंभ करण्यात आला. लहान मुलांच्या आरोग्यावर परिणाम झाला तर कुटुंबाची अवस्था शोचनीय होते. त्यामुळे सर्वप्रथम मुलांच्या आरोग्याची तपासणी करून कोणतेही दुष्परिणाम होण्याआधी योग्य ती खबरदारी घेतली पाहिजे, असे जिल्हा माता शिशु आणि लसीकरण अधिकारी डॉ आय. पी. गडाद यांनी यावेळी बोलताना सांगितले.
याप्रसंगी महापालिका आरोग्य अधिकारी डॉ संजय डूमगोळ, शिशु विकास अधिकारी एम. एस. रोट्टी, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. शिवानंद मगदूम, प्रकाश वाली, शिवाजी मळगेंण्णावर आदींसह शिक्षण खात्याचे अधिकारी, आशा व अंगणवाडी कार्यकर्त्या, शिक्षक आणि विद्यार्थी -विद्यार्थिनी उपस्थित होते.