Saturday, December 28, 2024

/

आगळी ऑफर : नांव ‘नीरज’ असेल तर घ्या फुकट बिर्याणी!

 belgaum

हरियाणा पानिपत येथील नीरज चोप्रा याने भालाफेकीत ऑलिंपिक सुवर्णपदक मिळविल्यानंतर देश-विदेशात नीरजचे कौतुक होत आहेच शिवाय सरकार सह अनेकांकडून त्याच्यावर बक्षिसाचा वर्षाव होत आहे.

नीरज चोप्राचे अखंड कौतुक होत असताना बेळगावातील एका हौशी हॉटेल व्यावसायिकाने बेळगाव किंवा आसपासच्या परिसरात ज्यांचे नांव ‘नीरज’ आहे त्यांना एक बिर्याणी मोफत देण्याची आगळी ऑफर जाहीर केली आहे.

Kareem biryani
ऑलिम्पिक सुवर्णपदक विजेत्या नीरज चोप्रा याच्या अभिमानास्पद कामगिरीबद्दल ही ऑफर येत्या 20 ऑगस्टपर्यंत खुली असणार असून ज्यांचे नांव नीरज असेल त्यांनी आधार कार्ड अथवा अधिकृत कागदपत्रे दाखवून एक बिर्याणी मोफत घेऊन जावी, असे आवाहन काँग्रेस रोडवरील ‘करीम किचन’ या हॉटेलने केले आहे.

करीम किचन हे हॉटेल रुचकर बिर्याणीसाठी सुप्रसिद्ध असून येथील मटन बिर्याणी विशेष लोकप्रिय आहे.ऑलम्पिक मध्ये ऐतिहासिक सुवर्ण पदकाची कमाई केलेल्या नीरज विषयी बेळगाव सारख्या छोट्याशा शहरांतून अशी प्रतिक्रिया येणे म्हणजे खेळा विषयी बेळगाव किती संवेदनशील आहे याचंच हे प्रतीक आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.