येळ्ळूर बस स्टॉप जवळ एका इसमाचा धारदार हत्याराने गळा चिरून खून केल्याची घटना वडगांव येथे घडली आहे. सोमवारी सकाळी साडे नऊच्या दरम्यान ही घटना घडल्याने एकच खळबळ माजली आहे.
महादेव जाधव वय अंदाजे 55 रा. भारत नगर वडगांव असे मयत इसमाचे नाव आहे.घटनास्थळी शहापूर पोलीस दाखल झाले असून अधिक तपास सुरू आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार महादेव यांचे वय अंदाजे 55 असून ते भारत नगर वडगांव येथे आपल्या बहिणीच्या घरी रहात होते.सोमवारी सकाळी येळ्ळूर बस स्टॉप जवळील रिक्षा स्थानका जवळ त्यांचा धारदार हत्त्याराने वार करून खून करण्यात आला. घटनास्थळी बघ्यांची गर्दी झाली होती.
हा खून नेमक्या कोणत्या कारणासाठी झालाय आणि कुणी केलाय याचा तपास सुरू आहे या भागात काही काळासाठी तणाव निर्माण झाला होता.