बेळगाव शहर व तालुक्यात कोरोना प्रतिबंधक लसीच्या पहिल्या व दुसऱ्या दुसऱ्यां डोसासाठी लसीचा पुरेसा साठा उपलब्ध करुन द्यावा अशी मागणी बेळगाव तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीतर्फे एका निवेदनाद्वारे जिल्हाधिकार्यांकडे करण्यात आली आहे.
बेळगाव तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीचे कार्याध्यक्ष माजी आमदार मनोहर किणेकर यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने आज उपरोक्त मागणीचे निवेदन जिल्हाधिकारी एम. जी. हिरेमठ यांना सादर केले.
जिल्हाधिकार्यांनी निवेदनाचा स्वीकार करून लसीचा पुरेसा साठा उपलब्ध करून देण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करण्याचे आश्वासन दिले. कोरोना प्रतिबंधक लसीचा अपुऱ्या पुरवठ्यामुळे बेळगाव शहर व तालुक्यात अद्याप बहुसंख्य लोकांना लसीचा पहिला व दुसरा डोस मिळालेला नाही.
कोरोनाच्या संभाव्य तिसऱ्या लाटेचा धोका असताना आता बेळगाव महापालिका निवडणूक प्रक्रिया सुरू झाली आहे. त्याचप्रमाणे श्री गणेश चतुर्थीचा सण तोंडावर आला आहे.
निवडणूक आणि सणामुळे साहजिकच गर्दी होणार असून पर्यायाने कोरोना संसर्गाचा धोका वाढणार आहे. तेंव्हा कोरोना प्रतिबंधक लसीचा त्वरित मुबलक पुरेसा उपलब्ध करून देण्याबरोबरच निवडणूक आणि श्री गणेश चतुर्थीपूर्वी शहर व तालुक्यातील सर्व नागरिकांचे लसीकरण पूर्ण केले जावे, अशा आशयाचा तर्फे निवेदनात नमूद आहे.
जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन सादर करतेवेळी किणेकर यांच्यासह ॲड. सुधीर चव्हाण, प्रकाश मरगाळे, ॲड. श्याम पाटील, विकास कलघटगी, एम. एम. मंगण्णावर, एस. एल. चौगुले आदी उपस्थित होते.