Thursday, November 28, 2024

/

शहापूर समितीही पंतप्रधानांना पाठवणार हजारो पत्रं

 belgaum

खानापूर तालुका महाराष्ट्र एकीकरण युवा समितीच्यावतीने मा. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना 9 ऑगस्ट क्रांती दिना निमित्त एक पत्र सीमाप्रश्नासाठी सीमाभागातून 11 हजार पत्रे पाठविण्याचा आंदोलन घेण्यात आले आहे.

या आंदोलनाला शहापूर विभाग महाराष्ट्र एकीकरण समितीच्या बैठकीत “एक पत्र सीमाप्रश्नासाठी” या उपक्रमाला शहापूर विभागातून हजारो पत्रे पाठविण्याShahapur mes meetingचा व या उपक्रमांला जाहीर पाठिंबा देण्यात आला.

यावेळी बैठकीत बोलताना राजकुमार बोकडे यानी हा उपक्रम स्तुत्य असुन या लाखभर पत्राची दखल देशाचे पंतप्रधान मा. नरेंद्र मोदी हे नक्की घेतील व आम्हाला न्याय मिळवून देतील अशी आशा बाळगूया या खानापूर महाराष्ट्र एकीकरण युवा समितीच्या उपक्रमाला पाठिंबा दर्शवून हा उपक्रम यशस्वी करुया असे मनोगत व्यक्त करण्यात आले.

यावेळी उपस्थित शिवाजी हावळ्नाचे,राजाराम मजुकर,राजु बोकडे,मनोहर शहापूरकर , शशिकांत काकडे,उमेश भातकांडे,रणजित हावळ्ळनाचे, अभिषेक हवालदर ,संदेश दावरी यासह अनेक समितीचे कार्यकर्ते उपस्थित होते.

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.