Saturday, December 28, 2024

/

1.15 लाखाची गोवा बनावटीची दारू जप्त

 belgaum

बेळगाव शहरातील सीईएन पोलिसांनी एका भाड्याच्या घरावर छापा टाकून 1 लाख 15 हजार रुपये किमतीचा गोवा बनावटीच्या दारूचा बेकायदेशीर साठा जप्त केला असून या प्रकरणी दोघांना अटक करण्यात आली आहे.

अनिल नारायण दमोणे (वय 28 वर्षे, रा. ढोर गल्ली -चव्हाट गल्ली बेळगाव) आणि राकेश केशव नायक (रा. कुमारस्वामी लेआउट बॉक्साइट रोड) अशी पोलिसांनी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत.

शहरातील महाबळेश्वरनगर येथील श्रीनिवास पाटील यांच्या मालकीच्या भाड्याच्या घरावर छापा टाकून सीईएन पोलिसांनी गोवा बनावटीच्या दारूच्या बाटल्यांचा बेकायदेशीर साठा जप्त केला.

ब्लेंडर प्राइड, रॉयल स्टॅग, रॉयल चॅलेंज, इंपिरियल ब्लू, मॅजीक मोमेंट व्होडका, रोमानोव व्होडका, मॅकडॉल रम, ओल्ड मोंक रम आदी विविध ब्रँडच्या 192 बाटल्या (155 लिटर) पोलिसांनी ताब्यात घेतले असून त्यांची बाजारातील किंमत 1 लाख 15 हजार रुपये इतकी होते. याप्रकरणी शहरातील सीईएन पोलीस ठाण्यात अबकारी कायद्यान्वये गुन्हा नोंद झाला असून अधिक तपास सुरू आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.