सीमाप्रश्नी जनतेनी पंतप्रधानांशी पत्रव्यवहार करावा-मध्यवर्ती अध्यक्ष

0
2
Mes youth wing
 belgaum

सीमाप्रश्नाकडे लक्ष वेधण्यासाठी खानापुर तालुका महाराष्ट्र एकीकरण युवा समितीतर्फे राबविण्यात येणारा उपक्रम अतिशय चांगला आहे यामध्ये अनेकांनी सहभाग घेऊन पंतप्रधान कार्यालयाशी पत्र व्यवहार करावा असे मत मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीचे अध्यक्ष दीपक दळवी यांनी व्यक्त केले आहे.

खानापूर तालुका युवा समितीतर्फे ऑगस्ट क्रांती दिन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना अकरा हजार पत्रे पाठवली जाणार आहेत. त्याबाबत माहिती देण्यासाठी समितीच्या पदाधिकाऱ्यांनी नुकतीच अध्यक्ष दीपक दळवी यांची भेट घेत कशा प्रकारे मोहीम राबविली जाणार आहे. याची माहिती दिली तसेच त्यांना निवेदन सादर केले.

त्यानंतर दळवी यांनी बोलताना गेल्या काही दिवसांपासून युवा कार्यकर्ते सीमाप्रश्न व मराठीवर होणाऱ्या अन्याया विरोधात आवाज उठवित असून एकाच वेळी अधिक प्रमाणात पत्रे पाठवण्यात आली तर त्याची दखल घ्यावी लागेल.Mes youth wing

 belgaum

त्यामुळे फक्त खानापूरातूनच नव्हे तर सीमाभागातील मराठी भाषिकांनी ही या मोहिमेला पाठिबा द्यावा. काही दिवसांपूर्वी केंद्रीय गृह राज्यमंत्री राय यांनी महाराष्ट्र कर्नाटक सीमाप्रश्न कायम असून या ठिकाणी सातत्याने हिंसाचार व शांततेचे वातावरण असते हे मान्य केले आहे. तसेच केंद्राने आसाम सीमेवर होत असलेल्या हिंसाचारा सारखी परिस्थिती निर्माण होऊ नये याची दखल घ्यावी असे मत व्यक्त केले.

यावेळी अध्यक्ष धनंजय पाटील, ज्ञानेश्वर सनदी, किशोर हेब्बाळकर दामोदर नाकाडी,भूपाल पाटील आदी उपस्थित होते. पत्र पाठविण्याबाबत करण्यात येत असलेल्या जनजागृतीला चांगला प्रतिसाद मिळत असून 9 ऑगस्ट रोजी 11 हजार पेक्षा अधिक पत्रे पाठविली जातील असा विश्वास व्यक्त केला जात आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.