खडेबाजार पोलीस स्थानक कार्यक्षेत्रातील चिरागनगर येथे छापा मारून पोलिसांनी 16.387 मिलिग्रॅम पन्नी जप्त केली असून याप्रकरणी दोघा जणांना अटक करण्यात आली आहे. छाप्याप्रसंगी अन्य तिघेजण फरारी झाले.
अर्झगान घोरी (रा. दरबार गल्ली) आणि युनूस मकानदार (रा. खंजर गल्ली) अशी पोलिसांनी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. फरारी आरोपींची नांवे सलमान शहा, यासीन शहापुरी आणि वासिम उर्फ भट गौंडी अशी आहेत.
बेळगाव शहरातील खडेबाजार पोलीसस्थानक व्याप्तीतील चिरागनगर येथे पोलीस खात्याच्या नार्कोटिक अर्थात मादक पदार्थ प्रतिबंधक एनडीपीएस दलाने छापा टाकून वरील दोघा जणांना अटक करताना 26 हजार 800 रुपये किंमतीच्या पन्नीच्या 67 चिठ्ठ्या जप्त केल्या. या प्रकरणी गुन्हा नोंद झाला असून अधिक तपास सुरू आहे.