बेळगाव मधील सह्याद्री नगर परिसरात छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा प्रतिष्ठापनेचा प्रयत्न करण्यात आला होता.याप्रकरणी पोलिसांनी कारवाईची भूमिका घेतली असून शिवभक्तांत नाराजी आहे.
महापालिका आणि पोलीस यांनी या प्रकरणी स्वतंत्र दोन गुन्हे दाखल केले आहेत. रविवारी रात्री साडे अकराच्या सुमारास ही घटना घडली होती.
महापालिकेच्या जागेत छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा प्रतिष्ठापनेसाठी परवानगी घेण्यात आली नव्हती. असा आरोप महापालिका व पोलिसांकडून करण्यात आला. त्यानंतर महापलिका आणि पोलिसांकडून या प्रकरणी दोन स्वतंत्र गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
सरकारी कामात अडथळा आणल्याचा आणि पोलिसांना धक्काबुक्की केल्याचा पोलिसांचा आरोप आहे. सुमारे तीस जणांवर हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आतापर्यंत या प्रकरणी चौघांना ताब्यात घेण्यात आले आहे. या प्रकरणाची एपीएमसी पोलिसांकडून चौकशी सुरू आहे.
छत्रपती शिवरायांच्या पुतळ्याचा विषय असल्याने पोलिसांनी हे प्रकरण सावधगिरीने आणि दोन्ही बाजू ऐकून घेऊन हाताळावे अशी मागणी आहे. या प्रकरणात राजकीय दबाव येत असल्याचा आरोपही होत असून त्याबद्दल चर्चा आहेत. वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी लक्ष घालण्याची मागणी होत आहे.