बेलवडी मल्लंमा यांचा खरा इतिहास बदलून छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान करणारे चित्र रेखाटून ते इंस्टाग्रामवर व्हायरल करणाऱ्या विरुद्ध शहरातील खडेबाजार पोलीस स्थानकात फिर्याद दाखल करण्यात आली आहे.
‘नवीन नान कन्नडीग’ या इंस्टाग्राम अकाउंटवर बेलावडी मल्लंमा यांच्या जयंती उत्सवाचे औचित्य साधून हा फोटो व्हायरल करण्यात आला आहे.
शहरातील बापट गल्ली येथील रहिवासी रोहित भाऊसाहेब मुरकुटे यांनी खडेबाजार पोलिस स्थानकात ‘नवीन नान कन्नडीग’ या इंस्टाग्राम आयडी असलेल्या व्यक्ती विरोधात फिर्याद दाखल केली आहे.
खऱ्या इतिहासाची माहिती नसताना या व्यक्तीने शिवाजी महाराजांचा अपमान केला आहे. त्याचप्रमाणे बेळगावमधील कन्नड आणि मराठी भाषिकांमध्ये प्रतिकूल वातावरण निर्माण करण्याचा प्रयत्न करणाऱ्या या समाजकंटकांवर कारवाई करावी, असे फिर्यादीने म्हंटले आहे.