बेळगाव शहर आणि परिसरात चोरीच्या घटना वाढतच आहेत.तालुक्यातील बस्तवाड येथील एका बंद घराचा पाठीमागील दरवाजा फोडून घरातील पाच तोळे सोने आणि 60 हजार रोख रक्कम लांबविण्यात आली आहे.
या घटनेमुळे खळबळ माजली आहे. भर दुपारी झालेल्या या घटनेत सहा लाखाचा ऐवज लंपास करण्यात आला आहे.
बस्तवाड येथील नारायण पाटील यांच्या घरी हा चोरीचा प्रकार घडला आहे. त्यांच्या घरी कोणी नव्हते, मुलं गवंडी कामाला गेली होती तर त्यांचीपत्नी शेताकडे गेली होती. नेमकी ही वेळ साधून चोरट्यांनी डल्ला मारला आहे.
सायंकाळी ही घटना उघडकीस आल्यानंतर लागलीच हिरेबागेवाडी पोलिसात तक्रार दाखल करण्यात आली. पोलिसांनी घटनास्थळी येऊन पंचनामा केला असून श्वानपथक आणून शोध घेण्याचा प्रयत्न केला.
पुढील तपास सुरू आहे.
बंद घराच्या पाठीमागचा दरवाजा फोडून चोरी करण्यात आल्याने चोर माहितगार असण्याचा संशय व्यक्त होत आहे.